एक भाकर तीन चुली Ek Bhakar Tin Chuli
Product Description
पुस्तकाचे नाव - एक भाकर तीन चुली लेखक - देवा झिंजाड प्रकाशक - न्यू एरा पब्लिशिंग हाऊस मुखपृष्ठासहित पानांची संख्या - 428 देवा झिंजाड यांनी आज प्रतिभावंत कवी, लेखक म्हणून तसेच 'झी मराठी'वरील 'हास्यसम्राट'चे यशस्वी स्पर्धक म्हणून नाव कमावले आहे; परंतु त्यांना हे यश सहज मिळालेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या आईने व त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर धैयनि मात करत देवा यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यामुळेच संघर्षाला घाबरून जीवनापासून पळ काढण्यापेक्षा हिंमतीने त्यातून मार्ग काढा व शिक्षणाची आस सोडू नका, हे ग्रामीण भागातील मुलांनी देवा झिंजाड यांच्याकडून मुद्दाम शिकण्यासारखे आहे. विशेष म्हणजे या संघर्षात कुठेही त्यांनी त्यांची संवेदनशीलता बोथट होऊ दिली नाही वा मनात, शब्दांत कडवटपणा येऊ दिला नाही. त्यांच्या आईने व त्यांनी जीवनाचा प्रवास खंबीरपणे यशस्वी करून दाखवला. त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत त्यांच्या आईच आहेत, हे त्यांनी वारंवार त्यांच्या काव्यातून व त्यांच्या मुलाखतींतून व्यक्त केले आहे. ...Read More